गणेशोत्सव 2024

Parel Cha Raja Visarjan | परळचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध असलेला लालबागचा राजा ज्याचे दर्शन घेण्यासाठी आपल्या देशातूनच नाही तर जग भरातून परदेशातून ही लोक दर्शन घेण्यासाठी येत होते.

Published by : Team Lokshahi

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध असलेला लालबागचा राजा ज्याचे दर्शन घेण्यासाठी आपल्या देशातूनच नाही तर जग भरातून परदेशातून ही लोक दर्शन घेण्यासाठी येत होते असा लालबागचा राजा आज भक्ताचा निरोप घेत आहे. लालबागच्या राज्याची एक झलक पाहता यावी यासाठी प्रत्येक जण आपला एक एक वेळ काढून फक्त या बाप्पाच्या मुख दर्शनासाठी धक्के खावून येत असताना पाहायला मिळाले. अशा लालबागच्या राज्याची आणि इतर ठिकाणच्या अनेक बाप्पाची आज विसर्जन मिरवणूक निघाली आहे.

मात्र लालबागच्या राज्याला पाहाटेच्या सुमारास निरोप देण्यात येणार आहे. विसर्जन बाप्पाचं पाहाटे होताना पाहायला मिळणार आहे. विसर्जन सोहळ्यादरम्यान उंच आणि मोठ्या गणेशमुर्ती देखील पाहायला मिळत आहे. गिरगाव चौपाटीवर अलोट अशी गर्दी पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाला ज्याप्रकारे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली होती तीच गर्दी आता गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी देखील पाहायला मिळत आहे. अशातच परळचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहचणारचं आहे.

मोठ्या जल्लोषात परळच्या राज्याची मिरवणूक याठिकाणी काढली जात आहे. परळचा राजा आता काही वेळातच गिरगाव चौपाटीवर पोहचणार आहे. तर बाप्पाच्या मिरवणूकीत अनेक भाविक भक्तजण डोळा ओला करून बाप्पाला निरोप देत आहेत. तसेच गिरगाव चौपाटी आज एका वेगळ्याच गर्दीत हरवलेली पाहायला मिळत आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा